सरकार धर्मांतर करण्यावर बंदी घालण्यास अयशस्वी का होत आहे ?

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर शासन जेव्हा सर्व धर्म समान घोषित करत असेल, तर त्या शासनाने त्वरितच धर्मांतर करण्यावर बंदी घातली पाहिजे; कारण की जर सर्व धर्म समान आहेत, तर कुणालाच धर्म पालटण्याची आवश्यकता पडते का ? सरकार धर्मांतर करण्यावर बंदी घालण्यास अयशस्वी का होत आहे ? याचे उत्तर देतांना डॉ. डेव्हिड प्रॉले म्हणतात, ‘‘स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्‍या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत. जे भ्रष्ट राजकारणी आहेत, ते ढोंगीपणे उदार धर्मनिरपेक्ष आहेत. ते स्वतःची खुर्ची आणि सत्ता यांच्या लालसेने भारतीय हिंदु समाजाला जातीयवाद आणि धर्म यांच्या नावाखाली आपली मतपेटी (व्होट बँक) वाढवण्यासाठी भरकटवत आहेत आणि समाजात आपापसांत द्वेष पसरवून ते भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत.’’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६)