सर्व समस्‍यांच्‍या निवारणासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापा !

अधिवक्ता सुभाष झा

‘सध्‍या भारतीय भाषांवर सातत्‍याने परकीय भाषेचे आक्रमण होत आहे. तुम्‍ही लक्षपूर्वक कुठलीही हिंदी वाहिनी वा कुठल्‍याही ८-१० वृत्तवाहिन्‍या पाहिल्‍या, तरी त्‍यांतून सगळ्‍याच वाहिन्‍यांची स्‍थिती तुमच्‍या लक्षात येईल. मी ४ वर्षांपूर्वी सर्व वाहिन्‍यांची सूची बनवली आणि सर्वच्‍या सर्व वाहिन्‍यांना संगणकीय पत्र पाठवून ‘भारतीय भाषा, नैतिकता आणि संस्‍कृती यांवर घाव घालून तुम्‍ही या देशाची वाट लावत आहात’, असे खडसावले होते. हे असे कुठपर्यंत चालणार ? या सगळ्‍या समस्‍या जर आपल्‍याला नष्‍ट करायच्‍या असतील, तर ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापन करण्‍याविना आपल्‍याला दुसरा पर्यायच नाही. त्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना जेवढ्या लवकर करू, तेवढे या देशाच्‍या भविष्‍यासाठी उत्तम होईल.’

– अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय, मुंबई.