जे करणे शक्‍य नाही, त्‍याचा शब्‍द कधीच देऊ नये ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मनोज जरांगे यांच्‍या उपोषणाचे समर्थन !

मनोज जरांगे आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार 

मुंबई – सरकारच्‍या भूमिकेमुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्‍न चिघळला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना ३० दिवसांच्‍या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचा शब्‍द दिला होता; पण आता ते आश्‍वासन पूर्ण झालेले दिसत नाही. जे करणे शक्‍य नाही, त्‍याचा शब्‍द कधीच देऊ नये. त्‍यामुळे आता उपोषण करणार्‍यांना दोष देता येणार नाही. सरकारने त्‍यांच्‍याशी संवाद साधला पाहिजे, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी २७ ऑक्‍टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केले. या वेळी त्‍यांनी मनोज जरांगे यांच्‍या उपोषणाचे समर्थन केले.