Begusarai Bihar : बेगुसराय (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

बेगुसराय (बिहार) – येथे २५ ऑक्‍टोबर या दिवशी श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीच्‍या विसर्जन मिवरणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्‍याने येथे तणाव निर्माण झाला. जमावाकडून येथील काही दुकाने आणि वाहने यांना लक्ष्य करण्‍यात आले. या घटनेत काही जण घायाळ झाले. पोलिसांनी स्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी लाठीमार केला.

पोलिसांनी मूर्ती विसर्जनानिमित्त मांस विक्रीची दुकाने बंद करण्यास सांगितले होते. विसर्जन मिरवणूक येथील कर्पूरी चौकात आली असता काही मांस विक्रेत्या दुकानदारांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. यात काही जण घायाळ झाले. यानंतर मिरवणुकीत सहभागी लोकांनीही प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली, तसेच काही दुकाने आणि वाहने यांना आग लावली. यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागवून जमावावर लाठीमार करत त्यांना पांगवले. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण आहे. घायाळ झालेल्यांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नितीश कुमार सरकारकडून आक्रमण करणार्‍यांना मोकळीक ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी नीतीश कुमार सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, आता हिंदूंना बेगुसरायमधून पलायन करायला हवे. हिंदूंनी देवतांची पूजा करणेही सोडून द्यावे; कारण सरकार आक्रमण करणार्‍यांना मोकळीक देत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदू आणखी किती वर्षे असे मार खात रहाणार आहेत ? हे कायमचे थांबवण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !