मणीपूरमध्ये हिंसाचारग्रस्त हिंदु मैतेईंना हिवाळ्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता !

‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !

इंफाळ (मणीपूर) – हिंसाचारग्रस्त मणीपूर राज्यातील हिंदु मैतेई समाजाची स्थिती दयनीय झाली आहे. राज्यातील काही भागात त्यांना साहाय्य शिबिरांत रहावे लागत आहे. तेथे त्यांना जीवनावश्यक सुविधांचा तुटवडा भासत असून येणार्‍या हिवाळ्यासाठी कपडे आणि अन्य गोष्टी यांची त्यांना आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी कार्य करणारी ‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ या संस्थेने हिंदूंना त्यांना साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून लिहिले की, ३ साहाय्य शिबिरांसाठी ७० जॅकेट्सची आवश्यकता आहे. तसेच ‘ओडोमॉस’च्या ३ सहस्र ट्यूब आणि मुलांसाठी ७० सहस्र रुपयांची शालेय पुस्तके हे साहित्य विकत घेण्यासाठी समाजाने सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. यासाठी ‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने सोबत जोडलेल्या ‘क्यू.आर्.कोड’ला स्कॅन करून अर्थसाहाय्य करण्याची विनंती केली आहे.

हिंदु मैतेईंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे ‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ !

या विषयासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांना संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी सांगितले की, मणीपूर येथील हिंदूंची स्थिती दयनीय आहे. त्यांच्या विरोधात कथानक रचून त्यांना चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याचा सामना करण्यासाठी काही हिंदु मैतेई एकत्र आले असून त्यांनी ‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. ही संस्था हिंदु मैतेईंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असून त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठीही पुढाकार घेत आहे. (‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’चे अभिनंदन ! असे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती होत ! मणीपूरमधील हिंदु मैतेईंना न्याय मिळवून देण्यासाठी भारतभरातील हिंदूंनी अशा संघटनांच्या पाठीशी उभे रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’च्या अधिकोषाचे विवरण (bank details) !

बँकेचे नाव : HDFC bank
बँकेतील खात्याचे नाव : Meitei Heritage Welfare Foundation
बँक खात्याचा क्रमांक : 50200084757524
IFSC क्रमांक : HDFC0000011
UPI ID : meiteiheritage@hdfcbank
संपर्क क्रमांक : ९८२१४८५२५९
QR code :