या तिथींचा लाभ घ्‍यायला विसरू नका !

१. अक्षय्‍य तृतीया : पूर्ण दिवस शुभ मुहूर्त. स्नान, दान, जप, तप, हवन इत्‍यादींचे या दिवशी अनंत फळ मिळते.

२. मोहिनी एकादशी : या दिवशी केलेल्‍या उपवासाने अनेक जन्‍मांची मेरू पर्वतासारखी महापातके नष्‍ट होतात. यात जप, ध्‍यान आणि पुण्‍यकर्म केल्‍यास याचे लाख पटींनी फळ मिळते.

३. वैशाख शुक्‍ल त्रयोदशीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंतचे स्नान : संपूर्ण वैशाख मासाच्‍या स्नानाचे फळ देते, तसेच या कालावधीत ‘गीता’ पाठ केल्‍यास अश्‍वमेध यज्ञाचेफळ मिळते.

४. भानुसप्‍तमी

५. अपरा एकादशी : या व्रताने पुण्‍यप्राप्‍ती होते आणि मोठमोठ्या पातकांचा नाश होतो.

६. सोमवती अमावास्‍या : या दिवशी तुळशीच्‍या १०८ प्रदक्षिणा केल्‍याने दारिद्य्राचा नाश होतो.

७. गुरुपुष्‍यामृत योग

(साभार : मासिक ‘लोक कल्‍याण सेतू’, एप्रिल २०१९)