आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनमधील खार्किव भागातील ह्रोझा गावावर केलेल्या आक्रमणात ५१ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण घायाळ झाले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, रशिया नागरिकांवर आक्रमण करत आहे. ज्या ठिकाणी आक्रमण झाले, तेथे केवळ नागरिक होते. या आक्रमणात गावातील २० टक्के लोकांचा मृत्यू झाला.
Russian missile struck an ordinary grocery store in the Kupiansk district of the Kharkiv region. This was a fully deliberate, demonstrative, and brutal terrorist attack.
As of now, more than 51 people have been reported dead. My condolences to all those who have lost their loved… pic.twitter.com/yxIW2Xwy35
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) October 5, 2023
या आक्रमणाविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेेलेंस्की म्हणाले की, रशियाचे हे अलीकडच्या काही मासांतील सर्वांत प्राणघातक आक्रमण होते. याचे उत्तर दिले जाईल.