मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

स्‍वत:ला ख्रिस्‍ती मानणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलीन यांना सनातन धर्म नष्‍ट करायचा आहे; पण द्रविड विचारधारेवर चालणार्‍या तमिळनाडू सरकारला तेथील जातीयवाद मिटवता आलेला नाही. उलट तो अधिक वाढलेला आहे. तेथील हिंदु आज हतबल झाला आहे. तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. द्रमुक सरकारला हिंदूंमधील भेदभाव दिसतो; मात्र चर्चमधील भेदभाव का दिसत नाही ? तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहेत. असे सरकार हिंदूंची मंदिरे चालवणार कि ती नष्‍ट करणार ?