देवरुख, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – साधनेतील सातत्य, चिकाटी आणि श्रीकृष्णाच्या सतत अनुसंधानात असणार्या येथील सनातनच्या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) सनातनच्या १२६ व्या संतपदी विराजमान झाल्या. देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्या रहात्या घरी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांना व्यष्टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली. याप्रसंगी सनातन संस्थेचे सद़्गुरु सत्यवान कदम यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी पू. आजींचे पुत्र श्री. विनय, सून सौ. नेहा, देवरुख येथील साधक, तसेच ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून पू. आजींची मुलगी सौ. प्राची जुवेकर, जावई श्री. हेमंत जुवेकर, तसेच नातू श्री. प्रशांत जुवेकर आणि त्यांची पत्नी सौ. क्षिप्रा जुवेकर या उपस्थित होत्या.
पू. (श्रीमती) विजया वसंत पानवळकर यांचा सन्मान सद़्गुरु स्वाती खाडये यांनी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन केला.
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)