कै. (सौ.) नम्रता ठाकूर यांच्याविषयी ठाणे जिल्ह्यातील साधिकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. शैला प्रवीण घाग, नौपाडा, ठाणे.
१ अ. नम्रपणे वागणे : ‘मी वर्ष १९९८ मध्ये माझे मामे सासरे श्री. प्रताप पंडित यांच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हापासून श्री. ठाकूरकाका आणि सौ. नम्रतावहिनी यांच्याशी माझे जवळचे नाते निर्माण झाले. सौ. नम्रतावहिनींचे वागणे त्यांच्या नावाला साजेसे नम्र असायचे.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा : त्यांना अनेक संसारिक अडचणी आल्या. त्या वेळी त्या नेहमी म्हणायच्या, ‘‘आपल्या प्रारब्धामुळे या अडचणी येतात; पण परात्पर गुरु डॉक्टर मला यातून बाहेर काढतील. आपली श्रद्धा दृढ असायला पाहिजे. त्या वेळी त्या लगेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करत असत.
१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेच्या बळावर प्रत्येक आजारपण स्थिर राहून स्वीकारणे
१. त्यांच्या कमरेच्या हाडाचे शस्त्रकर्म झाले होते. त्यामुळे त्यांना चालायला त्रास होत असे. तेव्हा त्यांना मधुमेहही होता.
२. एकदा त्यांना ‘स्वाइन फ्लू’ (डुक्कर ज्वर) झाला होता. त्या वेळी त्यांची सख्खी जाऊ संगीता ठाकूर यांचा ‘स्वाइन फ्लू’ होऊन मृत्यू झाला.
३. एकदा सौ. नम्रतावहिनींचा मुलगा अंकुर हा अतिदक्षता विभागात (‘आय.सी.यू.’मध्ये) होता आणि सौ. नम्रतावहिनी ‘स्पेशल रूम’ मध्ये होत्या. या प्रसंगातही त्या अगदी शांत होत्या. कुठेही रडणे नाही किंवा परिस्थितीला दोष देणे नाही. तेव्हा त्या पुष्कळ स्थिर असल्याचे जाणवले. त्या केवळ ‘परम पूज्य’, एवढेच बोलत होत्या.
४. कोरोनाच्या काळात त्यांनाही कोरोना झाला होता. आलेले प्रत्येक आजारपण त्यांनी स्वीकारले. ‘परम पूज्य आहेत आपण कशाला काळजी करायची ?’, असे त्या म्हणत असत.
५. सौ. नम्रतावहिनींना तिसर्या वेळी कर्करोग झाला. त्या वेळीही त्यांच्या चेहर्यावर भीती वाटल्याचे दिसत नव्हते. या वेळी त्यांच्या घरातील वातावरण पुष्कळ हलके वाटत होते. त्यांच्या चेहर्यावर दुःख जाणवत नव्हते.
१ ई. भावावस्था
१. एकदा मी त्यांना भेटायला गेले होते. आता त्या कुणाला ओळखत नाहीत आणि असंबद्ध बोलतात; पण त्यांना परात्पर गुरु डॉक्टर, सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि रामनाथी आश्रम, यांविषयी सर्व आठवते.
२. त्या सारख्या ‘रामनाथीला जायचे आहे’, असे म्हणत होत्या. तो विषय त्यांनी कुठेतरी विसरावा; म्हणून श्री. ठाकूरकाकांनी मला त्यांना भ्रमणभाष करायला सांगितला. तेव्हा त्या माझ्याशी सद़्गुरु अनुराधा वाडेकर समजून बोलत होत्या. नंतर त्या मला लगेच म्हणाल्या, ‘‘आज तुझ्या माध्यमातून सद़्गुरु अनुताई माझ्याशी बोलल्या.’’ तेव्हा मला आश्चर्य वाटले.
३. त्या मला म्हणाल्या, ‘‘परम पूज्य सांगत आहेत, ‘‘तुम्ही पुढे जा आणि मला आनंद द्या.’’ नंतर त्या म्हणाल्या, ‘‘अगं, ते मला किती आनंद देतात !’’
२. श्रीमती स्वाती कुलकर्णी, नौपाडा, जिल्हा ठाणे.
२ अ. गंभीर आजारामध्येही आनंदी रहाणे : ‘१४.८.२०२३ या दिवशी मी काही सेवेनिमित्त ठाकूरकाकांच्या घरी गेले होते. तेव्हा मी सौ. नम्रतावहिनींना भेटले. ‘इतक्या गंभीर आजारी असून मागील कित्येक दिवस नळीद्वारे द्रव पदार्थ घेत असूनही सतत आनंदी रहाणे’, ही दैवी लीलाच आहे.
२ आ. भावावस्थेतील बोलणे
२ आ १. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात रहाणे : ठाकूरकाकांनी सद़्गुरु अनुताईंविषयी बोलल्यावर नम्रतावहिनींना पुष्कळ आनंद झाला. त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज दिसत होते. त्यांचा भाव जागृत झाला होता आणि त्या भावावस्थेत सांगू लागल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आणि सद़्गुरु अनुताई माझ्यासाठी विमान घेऊन आले होते. सद़्गुरु अनुताई परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाल्या, ‘तुम्ही नाही आलात, तरी चालेल. आम्ही जाऊ.’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘मला यावेच लागणार.’ पुढे त्या अशाच भावविश्वात रमून सांगत होत्या. तेव्हा ‘त्या सतत परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत आहेत’, असे मला जाणवले.
२ आ २. कुठल्याही विषयाचा शेवट प.पू. डॉक्टरांशी जोडून करणे : नंतर पूर्वीच्या काही आठवणी निघाल्या. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही सेवेला जातांना माझा मुलगा तुमच्या घरीच रहायचा. तुमच्या आशीर्वादामुळेच तो मोठा झाला आहे. त्यांनी तुम्हाला पुष्कळ त्रास दिला असेल ना ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘नाही गं ! अक्षय मला पुष्कळ आवडतो. परवा बाजारात गेले असता अक्षय आणि तुझी नात देवीशा दिसली होती. मी प.पू. डॉक्टरांना सांगितले, ‘तिला पुष्कळ आशीर्वाद द्या.’ (बोलतांना विषय कुठलाही असला, तरी सौ. ठाकूर तो प.पू. डॉक्टरांशी जोडतात.)
२ आ ३. प्रत्यक्षात हलताही येत नसतांना शरिरावरील त्रासदायक शक्तींचे आवरण कसे काढायचे, ते शिकवणे : ठाकूरकाकांनी सौ. नम्रतावहिनींना ‘स्वतःवर आलेले अनिष्ट (त्रासदायक) शक्तींचे आवरण कसे काढायचे ?’, ते मला शिकवायला सांगितले. प्रत्यक्षात त्यांना हलता येत नाही; पण त्या वेळी त्यांनी ‘पूर्ण डोक्यापासून कमरेपर्यंत हात फिरवून आवरण कसे काढायचे’, ते मला शिकवले आणि नामजप करत आवरण काढायला सांगितले. त्या पुनःपुन्हा ‘साधना वाढवायला पाहिजे’, असे मला सांगत होत्या.
२ आ ४. सौ. नम्रतावहिनींना पाहून उन्नत साधक किंवा संत यांचा सत्संग मिळाल्यासारखा आनंद होणे : त्या म्हणाल्या, ‘‘मी प्रतिदिन आश्रमात सेवेला जाते. आश्रम म्हणजे देऊळच आहे.’’ त्यांच्याकडून निघाल्यावर मी आनंदावस्थेत होते. एरव्ही अशा प्रकारच्या रुग्णाला पाहून वाईट वाटते; परंतु सौ. नम्रतावहिनींना पाहून ‘उन्नत साधक किंवा संत यांचा सत्संग मिळाल्यावर जसा आनंद मिळतो’, तसे मला वाटले. गुरुदेव आम्हाला ‘साधना म्हणजे काय ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण दाखवून शिकवत आहेत. त्यासाठी कोटीशः कृतज्ञता वाटली.’
३. सौ. सुजाता शेट्ये, मुलुंड
३ अ. प्रेमभाव
१. ‘पूर्वी सौ. नम्रता ठाकूर यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील साधकांना नामजपादी उपाय सांगण्याच्या सेवेचे दायित्व होते. त्यामुळे आमचा नेहमी संपर्क होत असे. त्यांच्यातील प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे या गुणांमुळे माझे मन त्यांच्याकडे अधिक आकर्षित व्हायचे.
२. त्यांना मी प्रत्यक्ष पाहिले नव्हते; पण त्यांच्यातील गुणांमुळे मला त्यांच्याविषयी पुष्कळ आपुलकी आणि आधार वाटत असे. मी त्यांना भ्रमणभाष केला की, त्या रुग्णाईत असूनही माझ्याशी प्रेमाने बोलत असत.
३ आ. तत्परता
१. त्यांनी कधीच स्वतःच्या अडचणी सांगितल्या नाहीत. मी त्यांना नामजपादी उपायांच्या संदर्भात संपर्क केल्यावर त्या तत्परतेने आणि प्रेमाने प्रतिसाद देत असत अन् लगेचच मला त्याचे उत्तरही देत असत.
२. सद़्गुरु अनुराधा वाडेकर आम्हाला सांगत असलेली सूत्रे आम्ही एकमेकींना सांगत असू.
३ इ. सहवासात भावजागृती होणे : त्यांची सहनशीलता पाहून आणि त्यांचे बोलणे ऐकूनही माझी भावजागृती होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती उत्कट भाव जाणवतो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १५.८.२०२३)
|