झाशी (उत्तरप्रदेश) येथील नवोदय विद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण !

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील शाळेत झाशीतील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा काढला वचपा !

झाशी (उत्तरप्रदेश) – येथील बरुआसागर नवोदय विद्यालयाच्या वसतीगृहामध्ये ९ वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गातील १८ काश्मिरी विद्यार्थ्यांवर आक्रमण करून मारहाण केली. या वेळी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना वाचवले. या मारहाणीत एक विद्यार्थी घायाळ झाला. २६ सप्टेंबर या दिवशी जम्मू-काश्मीरमधील राजौरी नवोदय विद्यालयामध्ये बरुआसागर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीतून ही घटना घडली.

नवोदय शाळेत काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला:

बरुआसागर नवोदय विद्यालयात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीमार करत त्यांना पांगवले. या प्रकरणी झांसी येथील विद्यार्थ्यांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांकडून राजौरी येथे विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीविषयी रोष आहे. त्यांनी राजौरी येथून विद्यार्थ्यांना परत बोलावण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन्हीं विद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवण्यात येत आहे.

राजौरी येथे झाशीतील विद्यालयातून २० विद्यार्थी, तर राजौरी येथून १८ विद्यार्थी झाशी येथे पाठवण्यात आले होते. झांसी येथील विद्यार्थ्यांना काश्मीरमधील संस्कृती अभ्यासता यावी, यासाठी त्यांना राजौरी येथील विद्यालयात पाठवण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना तेथील मुसलमान विद्यार्थ्यांकडून मारहाण होते, हे काश्मीरमध्ये जिहादी मानसिकता कशी भिनलेली आहे, हे स्पष्ट होते ! यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद अद्याप नष्ट होऊ शकलेला नाही !