|
कुशीनगर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात एका चालत्या गाडीत तीन वासनांधांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेची ओढणी खेचून, तिला रस्त्यात फरफटत नेऊन बळजोरीने एका गाडीत बसवण्यात आले. चालत्या गाडीत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला आहे. पोलिसांनी कयामुद्दीन, जहांगीर आणि सिकंदर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. पीडिता आणि बलात्कारी एकाच पंथाचे असल्याचे सांगितले जात आहे.
#SP_KSN@dhawalips
के निर्देशन में थाना कप्तानगंज पुलिस द्वारा सामूहिक दुष्कर्म आदि के मुकदमे में वांछित तीन अभियुक्तों को किया गया गिरफ्तार- #UPPolice pic.twitter.com/ioAFtL6SYK— Kushinagar Police (@kushinagarpol) September 25, 2023
पीडितेच्या पित्याने म्हटले की, ९ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला; परंतु त्यांनी पोलिसांकडे दोनदा तक्रार प्रविष्ट करूनही बलात्कार्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शेवटी २४ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी या घटनेची नोंद घेत कारवाई केली. यामुळे कुशीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल यांनी कप्तानगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनय कुमार सिंह, पोलीस उपनिरीकक्षक मंगेश मिश्रा आणि महिला शिपाई अंतिमा सिंह यांना निलंबित केले आहे.
संपादकीय भूमिका
|