देशाला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ संबोधले जात असल्याच्या निमित्ताने
‘केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ सरकारने (‘एन्.डी.ए.’ने) ‘इंडिया’ या शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याला प्राधान्य दिले आहे. यावर नव्याने एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) या आघाडीने भाजपच्या विरोधात आवाज उठवत आहेत. वस्तूस्थिती ही आहे की, आपल्या देशाला ‘भारत’ या प्राचीन नावाने संबोधणे, यात नवीन असे काहीच नाही आणि ‘इंडिया’ या नावावर सरकारने पूर्णतः बंधन आणलेले नाही. याही पुढे जाऊन भूतकाळात ‘काँग्रेस सरकारनेच ‘इंडिया’च्या ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरावे’, याविषयी संसदेमध्ये प्रस्ताव मांडला होता !
१. ‘देशाचे नाव पालटले’, असे म्हणणार्यांनी स्वतःची बुद्धी गहाण ठेवली आहे !
भारताच्या राज्यघटनेत पहिल्याच कलमामध्ये ‘इंडिया’, म्हणजेच ‘भारत’, असे लिहिले आहे आणि त्याच्या मूळ प्रतीवर संसदीय सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत. तसेच त्यावर प्रख्यात चित्रकार नंदीलाल बोस यांनी काढलेली चित्रे आहेत. या चित्रांमध्ये देशाची राष्ट्रीय श्रद्धास्थाने असलेले श्रीराम, श्रीकृष्ण आणि इतरांची चित्रे आहेत. त्यामुळे आपल्या देशाला त्याच्या मूळ ‘भारत’ या नावाने संबोधण्यामध्ये काही चुकीचे नाही किंवा ते राज्यघटनेच्या विरुद्धही नाही. ‘आपल्या देशाला भारत म्हणणे, म्हणजे देशाचे नाव पालटले’, असे म्हणणार्यांनी स्वतःची बुद्धी गहाण ठेवल्यासारखे आहे.
२. विरोधी पक्षातील नेत्यांची कोणत्याही थराला जाण्याची सिद्धता !
तथाकथित ‘सेक्युलर’वाद्यांनी (निधर्मीवाद्यांनी) ‘भारत’ या नावाला विरोध करण्याचे कारण म्हणजे सरकारच्या या चालीमुळे नवीन युग, म्हणजे हिंदु राष्ट्राचा प्रारंभ होण्याची भीती त्यांना वाटते. या भीतीपोटी आणि हिंदुद्वेषापोटी ए. राजा आणि उदयनिधी स्टॅलिन या तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे द्रविड प्रगती संघाच्या) नेत्यांची सनातन धर्माच्या विरोधात विष ओकतांना त्याला एड्स, डेंग्यू आणि मलेरिया’, असे संबोधले आहे. याआधी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, समाजवादी पक्ष इत्यादी पक्षांनी हिंदु धर्माच्या विरोधात वाईट विशेषणे वापरली आहेत. ‘सेक्युलर’ टोळीमध्ये हिंदु राष्ट्राविषयीची भीती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे की, त्यांच्या नेत्यांची कोणत्याही थराला जाण्याची सिद्धता आह. त्यांची देशातील आणि देशाबाहेरील राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी करण्याचीही सिद्धता आहे. तथापि एक गोष्ट स्पष्ट आहे की, विरोधी पक्षांनी कितीही आरडाओरड आणि खटाटोप केला, तरी अधिकृतरीत्या आपला देश खरोखरच हिंदु राष्ट्र बनत आहे.
३. लोकांच्या भावना सांभाळणार्यांच्या हाती सत्ता येण्याची शक्यता !
राजकीय सत्तांना लोकशाहीची मूलतत्त्वे ठाऊक असायला हवीत. कायदेतज्ञांनी कितीही स्पष्टीकरणे दिली, तरी बहुसंख्य लोकांच्या इच्छाशक्तीचा विजय होईल. आता बहुसंख्य लोकांच्या भावना (हिंदु राष्ट्र स्थापन करणे) सांभाळण्यास कोणता पक्ष किंवा कुठल्या पक्षांची आघाडी यशस्वी ठरते ?, हे पहायचे आहे. जो पक्ष हे करण्यास यशस्वी होईल, त्याच्या हाती सत्ता येईल.’
– अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.