कु. तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजातील ‘श्री गणेशाय नम: ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हे तारक नामजप ऐकल्‍यावर कु. मधुरा भोसले यांना आलेल्‍या अनुभूती !

‘सप्‍टेंबर २०२१ मध्‍ये सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजात ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गं गणपतये नमः ।’ हे गणपतीचे तारक रूपातील नामजप ध्‍वनीमुद्रित करण्‍यात आले. दोन्‍ही नामजप सप्‍टेंबर मासात प्रतिदिन १० मिनिटे आश्रमातील ध्‍वनीवर्धकावर साधकांना ऐकवण्‍यात आले. ‘ते नामजप ऐकून काय अनुभूती येतात ?’, हे लिहून देण्‍यास सांगण्‍यात आले. या संदर्भात मला आलेल्‍या अनुभूती येथे देत आहे.

‘श्री गणेशाय नम: ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ या दोन नामजपांच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूतींतून ‘कुणाला कोणता जप करणे आवश्‍यक असते,’ हे शिकायला मिळते. यामुळे देवतांना विविध नावे असण्‍यामागील कारणही समजून येते.’

– परात्‍पर गुरु डॉ. आठवले (२१.९.२०२१) 

१. ‘श्री गणेशाय नम: ।’ हा नामजप ऐकल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

अ. नामजप ऐकत असतांना माझ्‍या आज्ञाचक्रावर चांगल्‍या संवेदना जाणवून मला आनंदाची अनुभूती आली.

आ. हा नामजप श्री गणेशाच्‍या तारक शक्‍तीचा असून त्‍याची तारक शक्‍ती गोलाकार वलयांच्‍या रूपात माझ्‍या आज्ञाचक्रातून माझ्‍या देहात गेल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे माझे संपूर्ण शरीर थंड झाले.

इ. नामजपातील ‘श्री गणेशाय’ हा शब्‍द ऐकतांना आनंद जाणवला आणि ‘नम:’ हा शब्‍द ऐकतांना माझ्‍या हृदयात आर्तभाव जागृत झाल्‍याचे जाणवले.

ई. हा नामजप सलग १० मिनिटे ऐकल्‍यावर माझ्‍या अनाहतचक्राच्‍या ठिकाणी मला शीतलता जाणवून शांतीची अनुभूती आली.

उ. हा नामजप ऐकतांना मला श्री गणेशाच्‍या डोळ्‍यांचे दर्शन झाले. त्‍याच्‍या डोळ्‍यांतून त्‍याची भक्‍तांवर असलेली असीम कृपा झळकत होती. त्‍याच्‍या मनोहर नेत्रांचे दर्शन घेतल्‍यावर माझे मन शांत आणि तृप्‍त झाले.

ऊ. हा नामजप करत असतांना ‘एकदंत, वक्रतुंड, विनायक, मंगलमूर्ती आणि प्रथमेश’ या श्रीगणेशाच्‍या विविध रूपांचे स्‍मरण झाले.

२. ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हा नामजप ऐकल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

कु. मधुरा भिकाजी भोसले

अ. हा नामजप करत असतांना मला माझ्‍या आज्ञाचक्राच्‍या ठिकाणी निळसर रंगाच्‍या ‘ॐ’ चे दर्शन झाले.

आ. ‘हा नामजप ऐकत असतांना माझ्‍या देहाभोवती पांढर्‍या रंगातील नामजप फिरत आहे’, हे सूक्ष्म दृश्‍य मला दिसले.

इ. हा नामजप करत असतांना मला श्रीगणेशाची अनन्‍य भक्‍ती करणार्‍या गणेशभक्‍त बाल बल्लाळाचे स्‍मरण झाले.

उ. गणपतीची सोंड मोठी होऊन तिने अनेक वाईट शक्‍तींना गुंडाळून अग्‍नीकुंडात फेकल्‍याचे सूक्ष्म दृश्‍य दिसले.

ऊ. एकदंत श्री गणेशाचा दात मोठा झाला आणि त्‍याने अनेक वाईट शक्‍तींचा नाश केल्‍याचे जाणवले.

ए. गणपतीचे रूप पुष्‍कळ मोठे झाले आणि नंतर ते ॐ कारात विलीन झाल्‍याचे जाणवले.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१८.९.२०२१)


‘श्री गणेशाय नम: ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ या नामजपांतील भेद

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.