‘महानवर बेबी केअर सेंटर’ येथे जिन्‍यात लावण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ‘टाइल्‍स’ (फरशा) काढल्‍या !

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्‍या निवेदनाचा सकारात्‍मक परिणाम !

शिराळा (जिल्‍हा सांगली) – ‘महानवर बेबी केअर सेंटर’ या रुग्‍णालयातील जिन्‍यामध्‍ये थुंकू नये; म्‍हणून हिंदु देवतांच्‍या ‘टाइल्‍स’ (फरशा) लावण्‍यात आल्‍या होत्‍या. ही गोष्‍ट हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना समजल्‍यावर तेथील हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या समवेत ‘महानवर बेबी केअर सेंटर’चे डॉ. विनायक महानवर यांना या फरशा काढून घेण्‍याविषयी निवेदन दिले. याला सकारात्‍मक प्रतिसाद देत डॉ. विनायक महानवर यांनी या फरशा काढल्‍या.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे म्‍हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीने निवेदन दिल्‍यावर डॉ. विनायक महानवर यांनी तात्‍काळ जिन्‍यांमधील फरशा काढून टाकून हिंदूंच्‍या धर्मभावना जपण्‍याची योग्‍य कृती केली. याच समवेत आम्‍ही या माध्‍यमातून आवाहन करतो की, अन्‍य कुठे रुग्‍णालय, संस्‍था, कार्यालय येथे अशा प्रकारे जिन्‍यामध्‍ये थुंकू नये; म्‍हणून हिंदु देवतांच्‍या फरशा लावल्‍या असतील, तर त्‍या काढून टाकाव्‍यात.’’