सरला तो श्रावण ।
उगवला हो भादवा (टीप १) ।
श्री गणेशाच्या आगमनाला ।
घर सजवू चला ॥ १ ॥
लावूया माळा घराला तोरण ।
येणार तो गणराया म्हणून ।
बुद्धीदाता तो प्राणशक्ती देणारा ।
करूया प्रार्थना मनापासून ॥ २ ॥
सोबत येणार्या माहेरवाशिणी ।
आणूया दागिने नि नवी साडी चोळी ती ।
आनंदीआनंद नांदतो ग घरा-गावांत ।
काय कमी हो आपणा गणराया येताच ॥ ३ ॥
नैवेद्य तो मोदकांचा गणरायाला ।
पुरणपोळी करूया गौरी मातेला ।
घेऊया प्रसाद आनंदाने सकल ।
वाटूया तो येणार्या-जाणार्याला ॥ ४ ॥
जाणार त्या गौराई जाणार गणराया ।
म्हणून होऊ नका निराश ।
आहेत सदैव ते आपल्या अणुरेणूत ।
दिसतो हृदयात तयांचा प्रकाश ॥ ५ ॥
त्यांना देऊया निरोप सहर्ष वदने ।
बोलवू त्यांना परत हर्षभराने ।
गणराया गौरी या होे झणी (टीप २) परत ।
वाट तुमची पहातो डोळे लावून ॥ ६ ॥
टीप १ : भादवा – भाद्रपद मास
टीप २ : झणी – लवकर
– रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वय ७० वर्षे), (१२.८.२०२२)
(Ganpati)