कानपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चने अल्पवयीन हिंदु मुलाला धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

संपूर्ण कुटुंबाने धर्मांतर केल्यास १ घर देण्याचे आमीष !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर बजरंग दलाने चर्च बाहेर आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी येथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. चर्च आणि बजरंग दल यांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. ही घटना १० सप्टेंबरला घडली.

पीडित अल्पवयीन मुलाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी चर्चचा पाद्री आनंद डेनियल याने त्याला धर्मांतर करण्यासाठी ५० सहस्र रुपयांचे आमीष दाखवले होते. तसेच ‘संपूर्ण कुटुंबाने धर्मांतर केल्यास एक घर देईन’, असेही सांगितले होते. मुलाने धर्मांतरासाठी नकार दिल्यानंतरही डेनियल त्याच्यावर दबाव आणत होता.

संपादकीय भूमिका

धर्मांतरच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावत होते, ते अद्यापही चालूच आहे. यासाठी भाजप सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशीच हिंदूंची मागणी आहे !