कळवा येथे रिक्‍शाचालक नशा करत असल्‍याचा व्‍हिडिओ प्रसारित !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, १३ सप्‍टेंबर (वार्ता.) – कळवा रेल्‍वेस्‍थानक परिसरातील रिक्‍शा थांब्‍यावर रिक्‍शाचालक नशा करत असल्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे. यामुळे प्रवासी संतप्‍त झाले आहेत. पोलिसांनी अन्‍वेषण करून विनोद गुप्‍ता, गजानन साळुंखे आणि महंमद शेख या तिघांना कह्यात घेतले असून पुढील अन्‍वेषण पोलीस करत आहे. (नशा करून वाहन चालवून प्रवाशांच्‍या जिवाशी खेळणार्‍या रिक्‍शाचालकांवर कठोर कारवाई अपेक्षित ! – संपादक)