पाकिस्तानात अणुबाँब सामग्रीच्या निर्मितीसाठी उभारण्यात आलेले युरेनियम संवर्धन प्रकल्प पूर्णत्वास !

इस्लामाबाद – पाकिस्तानातील कहुटा आणि गडवाल येथे अणुबाँब सामग्रीच्या निर्मितीसाठी उभारण्यात येणारे प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. हे सर्व प्रकल्प युरेनियम संवर्धन प्रकल्प आहेत. ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट’च्या अणु माहिती प्रकल्पातील संशोधक एलियाना जोन्स आणि मॅट कोर्डा यांनी पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाविषयी उपग्रह प्रतिमांच्या आधारे सिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

मॅट कोर्डा म्हणाले, ‘‘आमचा अंदाज आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे समान प्रमाणात आण्विक साठा आहे. दोन्ही देश केवळ त्यांची आण्विक सिद्धता वाढवत नाहीत, तर संघर्षाच्या वेळी अधिक वेगाने अण्वस्त्रे प्रक्षेपित करू शकतील, अशी यंत्रणाही ते सिद्ध करत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविषयक स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे.’’ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खुशाबच्या दक्षिणेस खुशाब संकुलात ४ नव्याने बांधलेल्या ‘हेवी वॉटर प्लूटोनियम उत्पादन अणुभट्ट्या’ कार्यरत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. (यातून पाकिस्तानचा अण्वस्त्र निर्मितीचा सपाटा लक्षात येतो. भारताने वेळीत सावध रहावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे’, या धोरणाप्रमाणे भारताने अगोदरच पाकचा निःपात करणे आवश्यक आहे !