काशी, अयोध्या आणि उज्जैन नंतर मथुरेचा कायापालट होणार !

मथुरेला धार्मिक पर्यटन शहर बनवण्यात येणार

(चित्रावर क्लिक करा)

मथुरा (उत्तरप्रदेश) – काशी, अयोध्या आणि उज्जैन यांच्यानंतर आता मथुरेचा कायपालट करण्यात येणार आहे. मथुरेला धार्मिक पर्यटन शहर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याचा प्रारंभ याच वर्षापासून होणार आहे. ज्या प्रमाणे काशी येथील विश्‍वेश्‍वराचे मंदिराचा परिसर गंगानदीपर्यंत विस्तारण्यात आला, त्याच प्रमाणे मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराचा परिसर यमुना नदीपर्यंत विस्तारण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या तीर्थस्थळांना धार्मिक पर्यटन केंद्र न बनवता ती हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्र होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! भारताला विश्‍वगुरु व्हायचे असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !