ठाणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे मराठा आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी ठाणे बंद पुकारण्यात आला होता.
व्यापारी आणि दुकानदार यांनी दुकाने बंद ठेवली होती. रिक्शांची संख्या प्रतिदिनच्या तुलनेत अल्प होती. त्यामुळे नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. ठाणे पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.