आत्‍महत्‍येचा प्रयत्न करणार्‍या ३१ वर्षीय तरुणीचा कोलवडीतील (पुणे) ३ युवकांनी जीव वाचवला !

जीव वाचवणार्‍यांमध्‍ये धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा सहभाग !

प्रतिकात्मक छायाचित्र

लोणी काळभोर (जिल्‍हा पुणे) – थेऊर-कोलवडी रस्‍त्‍यावरील मुळा-मुठा नदीवर असलेल्‍या पुलावरून वाघोली परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्न केला. यामध्‍ये ३ तरुणांनी दाखवलेल्‍या समयसूचकतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत. या तरुणीवर सध्‍या एका खासगी रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. सर्वश्री प्रवीण इसावे, विजय गायकवाड आणि संजय घुमे असे प्राण वाचवणार्‍या तिघांची नावे आहेत. त्‍यापैकी श्री. विजय गायकवाड हे कोलवडी येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमी आहेत. त्‍यांचा समितीच्‍या कार्यातही सक्रीय सहभाग असतो.

श्री. प्रवीण इसावे हे हडपसर या ठिकाणी एका अधिकोषात उपव्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करतात. काही कामानिमित्त संध्‍याकाळी साडेसहा वाजता ते थेऊर या ठिकाणी गेले होते. या वेळी पुलावर एक तरुणी नदीत उडी मारणार असल्‍याचे लक्षात आले. या वेळी प्रवीण यांनी विजय गायकवाड यांना तात्‍काळ संपर्क साधून तेथे घेऊन आले. या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता या तरुणीने नदीत उडी मारल्‍याचे दिसून आले. या वेळी त्‍या ठिकाणी असणारे सर्वश्री संजय घुमे, विजय गायकवाड आणि प्रवीण इसावे यांनी तिला पाण्‍यातून बाहेर काढले. या वेळी प्रवीण यांनी लोणी काळभोर पोलिसांना तात्‍काळ संपर्क साधला. पोलिसांनी स्‍थानिकांच्‍या साहाय्‍याने या तरुणीला उपचारासाठी रुग्‍णालयात नेले.

संपादकीय भूमिका

महान भारतीय संंस्‍कृती असलेल्‍या भारतात धर्मशिक्षण नसल्‍यामुळे आत्‍महत्‍येचे परिणाम जनतेला समजत नाहीत, हे दुर्दैवी !