अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आदी देशांना एकमेकांना रेल्वेने जोडण्यावर होणार चर्चा !

(डावीकडून )भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन , आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

वॉशिंगटन (अमेरिका) – अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आणि अन्य काही देशांचे नेते रेल्वेमार्ग आणि बंदर यांच्या माध्यमांतून एकामेकांना जोडण्याच्या संदर्भात मूलभूत सुविधांवर चर्चा करणार आहेत. चीन ‘बेल्ट अँड रोड व्हिजन’ या प्रकल्पाद्वारे अन्य देशांना चीनशी रस्ते, रेल्वे आदींच्या माध्यमातून जोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाला समांतर प्रकल्प राबवून विरोध करण्याचा अमेरिका आणि अन्य देश प्रयत्न करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत अमेरिका आखाती देशांना रेल्वे मार्गाद्वारे जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.