महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांच्या आवाजात विविध देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा श्रीकृष्णाचा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकतांना काय जाणवते ?’, याचा अभ्यास साधकांना करायला सांगितला होता. हा नामजप ऐकतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. वैशाली मुद़्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२१)
अ. ‘मला आकाशात श्रीकृष्णाच्या विराट रूपाचे दर्शन झाले.
आ. मला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र पिवळ्या रंगाचे दिसले.’
२. सौ. शुभांगी सेंगर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘मला श्रीकृष्णाचा सुदर्शनचक्र घेतलेला हात दिसत होता. त्याच्या हातातील सुदर्शनचक्र फिरत होते.
आ. हे दृश्य पहातांना मला आज्ञाचक्रावर संवेदना जाणवल्या.’
३. श्री. नंदकुमार कैमल, केरळ
अ. ‘मला नामजप ऐकतांना आरंभी हलकेपणा जाणवला.
आ. नंतर ‘संपूर्ण शरिरात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
इ. माझे मन एकाग्र होऊन ‘ते नामजपाशी एकरूप होत आहे’, असे मला जाणवले.’
४. श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२१)
अ. नामजप ऐकतांना ‘मी देवाला आळवत आहे. माझ्यातील श्रीकृष्णाला जागृत करत आहे’, असे जाणवून माझा भाव जागृत होत होता.
आ. दिवाळीच्या कालावधीत ‘भुईचक्र’ पेटवल्यावर ज्याप्रमाणे ते गोल गोल फिरते, त्याप्रमाणे नामजप ऐकतांना मला माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवत होत्या.’
५. सौ. भक्ती कुलकर्णी, फोंडा, गोवा.
अ. ‘नामजपातून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
६. श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक कपातळी ६९ टक्के, वय ८१ वर्षे) केरळ.
अ. ‘डोळे मिटून नामजप ऐकतांना ‘श्रीविष्णूच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांसमोर बसले आहेत’, असे मला जाणवले.
आ. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.
इ. ‘नामजप वैकुंठात होत आहे’, असे मला वाटत होते. नामजपाच्या वेळी ‘ती दिव्य वाणी आहे’, असे मी अनुभवले.’
७. कु. म्रिणालिनी देवघरे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.९.२०२१)
अ. ‘ध्वनीक्षेपकावर श्रीकृष्णाचा नामजप चालू झाल्यावर माझाही नामजप आतून आपोआप चालू झाला.
आ. नामजप चालू झाल्यावर मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. २ – ३ मिनिटांनी माझे ध्यान लागले.
इ. नामजप ऐकतांना मी अंतर्मुखता आणि निर्विचार स्थिती अनुभवली.
ई. ‘सर्वत्र आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.
उ. ‘नामजपामध्ये एखादे संगीत चालू आहे’, असे मला जाणवले.
ऊ. दोन मिनिटांनी सूक्ष्मातून कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) ही साधिका नृत्य करत आहे’, असे मला दिसले. नामजप ऐकतांना मला अलपद्म’ (टीप) ही मुद्रा करावी आणि मुद्रेसहित नृत्य करण्याची इच्छा झाली.
टीप – अलपद्म (उमललेले कमळ) ही एक असंयुक्त मुद्रा आहे. ही मुद्रा करतांना प्रथम सर्व बोटे एकमेकांपासून दूर ठेवावीत. नंतर करंगळीपासून क्रमाने एक एक बोट आतल्या बाजूस वळवून ठेवावे. अंगठा बाहेरच्या दिशेला जितका वळवून ठेवता येईल तितका ठेवावा.
ए. नामजप ऐकून माझी भावजागृती झाली.’
काळानुसार नामजप करून आनंद अनुभवा !‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित केला असून तो सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. १. नामजप ऐकण्यासाठी सनातनच्या संकेतस्थळाची मार्गिका : https://www.sanatan.org/mr/chant २. ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/Chaitanyavani ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास त्या आम्हाला [email protected] या ई-मेल पत्त्यावर किंवा ई-मेल नसलेल्यांनी पुढील पत्त्यावर अवश्य कळवावा. टपालाचा पत्ता : श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.’ |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |