संसदेच्या विशेष अधिवेशनाचा विषय न सांगितल्यावरून सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

नवी देहली – येत्या १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ‘या अधिवेशनाचा विषय काय असणार आहे ?’ हे सरकारकडून सांगण्यात आलेले नाही. याविषयी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, पहिल्यांदा विरोधी पक्षांना अधिवेशनाचा विषय सांगण्यात आलेला नाही. देशाच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील, तर ‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.