आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक न झाल्याने समस्या
राज्यात विनयभंगांची प्रकरणे वाढत असतांना गेले ६ मास महिला आयोगावर सदस्यांची नेमणूक न होणे दुर्दैवी !

पणजी, ५ सप्टेंबर (वार्ता.) – राज्य महिला आयोगाकडे वर्ष २०२० पासून सुमारे ३२२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणांच्या सुनावण्या गेले ६ मास झालेल्या नाहीत. सरकारने ६ मासांपूर्वी रंजिता पै यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे; मात्र सरकारने आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक केलेली नसल्याने या सुनावण्या प्रलंबित आहेत.
राज्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य महिला आयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. घटस्फोट, घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार आदी विविध प्रश्न महिला आयोगासमोर मांडत असतात. महिलांची गार्हाणी ऐकून त्यांवर सुनावण्या घेऊन महिलांना योग्य न्याय देण्याचे आणि वेळप्रसंगी महिलांचे समुपदेशन करण्याचे दायित्व आयोगाचे आहे. यापूर्वी विद्या गावडे सतरकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या कार्यकाळात सुमारे ३२२ प्रकरणांच्या सुनावण्या आयोगाकडे चालू होत्या. गेल्या ६ मासांत यातील अनेक प्रकरणांच्या सुनावण्या घेऊन त्यावर आयोग अंतिम निर्णय देऊ शकला असता; मात्र आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक न झाल्याने अध्यक्षा रंजिता पै यांना सुनावण्या घेता येत नाहीत.
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक