|
नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे तेथील शिया मुसलमानांकडून पाकिस्तानी सैन्य आणि सुन्नी मुसलमान संघटना यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. येथील शिया संघटनांनी पहिल्यांदाच सैन्याच्या विरोधात आवाज उठवला. शिया मुसलमानांकडून भारताकडे जाणारा कारगिल महामार्ग उघडण्याची मागणी केली जात आहे. त्यांना गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये रहायचे नसून भारतात जायचे आहे.
१. येथील २० लाख लोकसंख्येपैकी ८ लाख शिया मुसलमानांकडून आंदोलन केले जात आहे. यामुळे पाक सैन्याने येथे २० सहस्र अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. येथे भ्रमणभाषवरील इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
२. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये वर्ष १९४७ नंतर शिया मुसलमानांना येथून पळवून लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सैन्याने येथे जाणीवपूर्वक सुन्नी मुसलमानांना वसवले. शियाबहुल क्षेत्रांत आता शिया अल्पसंख्याक झाले आहेत.
सौजन्य : CNN-News18