सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कुडाळ येथील श्री. चंद्रशेखर तुळसकर (वय ६९ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

१. कौटुंबिक अडचणींनी त्रस्त असणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन करायचे आहे’, हे ऐकून आनंद होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘काही मासांपासून मला कौटुंबिक अडचणी येत आहेत. मला आणि कुटुंबियांना शारीरिक अस्वास्थ्यामुळे ‘आपत्काळसदृश स्थिती आहे’, असे वाटते; परंतु ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हाला प्रत्येक लहान-मोठ्या समस्येला तोंड देता येत आहे’, याची मला आतून जाणीव होते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन करायचे आहे’, असे कळल्यावर ‘माझ्या जीवनात सकारात्मक अन् आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे’, असे मला जाणवू लागले.

२. ब्रह्मोत्सवाच्या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

श्री. चंद्रशेखर तुळसकर

अ. ११.५.२०२३ या दिवशी (ब्रह्मोत्सवाच्या दिवशी) सकाळी मला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक पहायला मिळाला. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘प्रत्यक्ष गुरुदेव समोर उभे आहेत आणि मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आहे’, असे दृश्य मला दिसले अन् माझी भावजागृती झाली.

आ. अनेक दिवसांपासून मला जो शारीरिक आणि मानसिक ताण आला होता, तो गुरुदेवांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्र पाहिल्यावर क्षणार्धात नष्ट झाला.

३. ११.५.२०२३ या दिवशीचा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम मला गुरुकृपेमुळे घरीच ‘ऑनलाईन’ पहायला मिळाला. ‘तो आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष वैकुंठात साजरा होत आहे’, असे मला पदोपदी जाणवत होते.

‘गुरुदेवा, मला हा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम तुमच्या कृपेमुळे अनुभवण्याची संधी मिळाली; परंतु त्याविषयीची कृतज्ञता मला शब्दांत व्यक्त करता येत नाही. गुरुदेवा, ‘मला आपल्या चरणांपाशी सतत राहू द्या’, अशी मी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

– श्री. चंद्रशेखर तुळसकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६९ वर्षे), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक