३०.८.२०२३ या दिवशी रक्षाबंधन आहे. त्या निमित्ताने…
आज असे रक्षाबंधन ।
प्रार्थना करिते देवाकडे ।
बाकी काहीच नको रे ।
साधनेत ने पुढे
बंधूरायांना लवकर रे ॥ १ ॥
देव हसूनी ‘हो’ म्हणाला ।
पण गमतीत मला म्हणाला ।
तुझे भाऊ आहेत फार छान ।
तुझे करतात जरा जास्तच लाड ॥ २ ॥
देवाशी काय बोलावे ।
हे मला कळेनासे झाले ।
घट्ट धरूनी त्याच्या चरणांशी ।
काय तुला अपेक्षित, असे मी विचारले ॥ ३ ॥
आहात फार भाग्यवान तुम्ही, असे देव म्हणाला ।
गुरूंनी घेतले त्यांच्या चरणांशी तुम्हाला ।
साधनेत प्रगती करून दाखवा ।
श्री गुरूंनी दिलेल्या या नात्याचा
खर्या अर्थाने लाभ करून घ्यावा ॥ ४ ॥
स्वतः प्रयत्न करता करता ।
भावा-बहिणींनी एकमेकांनाही साहाय्य करा ।
श्री गुरूंना मग नक्कीच आनंद होईल ।
हे गुरुबंधूपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करता येईल ॥ ५ ॥
चल तर मग दादा ।
करूया ना प्रयत्न ।
साहाय्य करून एकमेकां ।
प्रगती करूया साधनेत ॥ ६ ॥
आहेत श्री गुरु पाठीशी ।
सर्वस्व त्यांना अर्पूनी ।
मनात तळमळ ठेवूनी ।
जाऊया त्यांच्या चरणांशी ॥ ७ ॥
ध्यास गुरुचरणप्राप्तीचा ठेवूया ।
या नात्याचा आध्यात्मिक लाभ करून घेऊया ।
नुसतेच नको बहीण-भाऊ ।
तर गुरुबंधू-भगिनी होऊ ॥ ८ ॥
हे बंधूपुष्प अर्पण करूया श्री गुरुचरणी ।
दादा, भावपूर्ण नमस्कार रक्षाबंधनाच्या निमित्ताने ।
तुझी साधनेत प्रगती होऊ दे जलद गतीने ।
प्रार्थना असे गुरुचरणी ॥ ९ ॥
– कु. वेदिका दहातोंडे (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२२)
भावा-बहिणीचे प्रेमळ नाते ।
भावा-बहिणीचे हे नाते किती प्रेमळ असे ।
दिसत नसली, तरी प्रीती अढळ असे ॥ १ ॥
वेळ पडल्यास लढतो तो बहिणीसाठी ।
तितकेच हृदय असे मऊ फूलपाकळीसारखे ॥ २ ॥
बहिणीचीही माया अपार ।
या प्रेमळ आणि खट्याळ भावावर ॥ ३ ॥
काय करू नि काय नको ।
असे होते तिला भावासाठी ॥ ४ ॥
शब्द नाही अजून या नात्याविषयी ।
अनुभवूनच आनंद, होऊया आनंदी ॥ ५ ॥
– कु. वेदिका दहातोंडे (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |