रक्षाबंधनाला हिंदु भगिनींना कॅडबरी नव्‍हे, तर स्‍वसंरक्षणासाठी प्रोत्‍साहित करणे आवश्‍यक ! – काजल हिंदुस्‍थानी, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘लव्‍ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हेच खरे रक्षाबंधन !’

मुंबई – ‘हिंदूंच्‍या मुलींना फसवून आणि त्‍यांना पळवून आपल्‍या जनानखान्‍यात डांबणार्‍यांना हिंदु जावई नको आहे’, असे नॅरेटिव्‍ह (कथानक) स्‍थापित केले जात आहे. हिंदु मुलगी मुसलमानाला पत्नी म्‍हणून चालते; परंतु मुसलमान युवतीने हिंदु मुलावर प्रेम केले, तर त्‍याचा जीव का घेतला जातो ? तेव्‍हा तथाकथित ‘भाईचारा’ कुठे जातो ? जो धर्मांध आपल्‍या सख्‍ख्‍या बहिणीशी विवाह करणे चुकीचे मानत नाही, त्‍याला आपल्‍या घरात घेतांना हिंदु बांधवांनी १० वेळा विचार करावा. आतापर्यंतच्‍या घटनांमधून ‘लव्‍ह जिहाद्यां’ची मानसिकता ओळखा आणि आपल्‍या परिवाराला वाचवा ! त्‍यामुळे ‘हिंदु भगिनीला रक्षाबंधनाला आता कॅडबरीची नाही, तर स्‍वसंरक्षणासाठी प्रोत्‍साहित करण्‍याची आवश्‍यकता आहे’, असा संदेश प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ काजल हिंदुस्‍थानी यांनी रक्षाबंधनाच्‍या निमित्ताने दिला. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘लव्‍ह जिहादपासून हिंदु भगिनींचे रक्षण, हेच खरे रक्षाबंधन !’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्‍या बोलत होत्‍या. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्‍ते श्री. सतीश कोचरेकर यांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ काजल हिंदुस्‍थानी यांनी मांडलेली उद़्‍बोधक सूत्रे

१. उच्‍चशिक्षित चांगल्‍या घरातील हिंदु मुली भंगार गोळा करणार्‍या किंवा पंक्चरवाल्‍या (वाहनांच्‍या टायरचे पंक्चर काढणार्‍या) मुसलमान युवकांसह पळून जातात. अशा घटनांमागे बॉलीवूडमधून देण्‍यात येणारे ‘सॉफ्‍ट पॉयझन’ (सौम्‍य विष) कारणीभूत आहे. अशा युवती बॉलीवूडमधील (चित्रपट क्षेत्रांतून) आंतरधर्मीय विवाह करणार्‍या अभिनेत्रींना आदर्श मानतात. त्‍या मुलींना त्‍या मागील काळी बाजू समजत नाही. त्‍या ‘शाहरुख’ची गौरी (अभिनेते शाहरुख खान यांच्‍या पत्नी गौरी) होण्‍याचा प्रयत्न करतात; पण त्‍यांना हे समजत नाही की, त्‍यांचा ‘शाहरुख’ पंक्चर काढणारा असतो.

२. आज धर्मांधांना हिंदु युवतींना फसवून आणण्‍याचे प्रशिक्षण दिले जाते. त्‍यासाठी पैसा दिला जातो. हिंदु युवती भ्रमित होण्‍यामागे बॉलीवूड, सामाजिक माध्‍यमे, ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ (‘ओटीटी’ म्‍हणजे ‘ओव्‍हर द टॉप’ ! आस्‍थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्‍हणजे ‘ओटीटी’) आणि टीव्‍हीवरील विज्ञापने कारणीभूत ठरत आहेत.

३. आज आपल्‍या मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था नाही; मात्र मदरशांतून धर्मासह लढण्‍याचेही प्रशिक्षण दिले जाते. आपल्‍याला अहिंसेचा अतिरेक करण्‍याचे बाळकडू देऊन तेजहीन करण्‍याचे कारस्‍थान चालू आहे.

४. आज विविध प्रकारच्‍या जिहादसाठी मौलानांना (इस्‍लामी अभ्‍यासकांना) पैसा पुरवठा होत आहे; तर हिंदु धर्मियांनी मंदिरांना दिलेला निधी सरकार पळवत आहे. अशामुळे हिंदु समाज कमकुवत झाला आहे.

५. हिंदु समाजाची जेवढी हानी मोगल आणि ब्रिटीश यांनी केली नसेल, तेवढे काँग्रेसी, ‘सेक्‍युलर’वादी (निधर्मीवादी) सरकारांसह साम्‍यवादी इतिहासकार आणि ख्रिस्‍ती शिक्षणपद्धतीने केले आहे. या संदर्भात हिंदु संघटनांनी घरोघर जाऊन प्रबोधन करण्‍याची आवश्‍यकता आहे. हिंदु बांधवांनाही कोणत्‍या ना कोणत्‍या हिंदु संघटनेशी जोडून घ्‍यावे लागेल.

६. वयात येणार्‍या मुलींमध्‍ये ‘हार्मोनल चेंजेस’ (संप्रेरकांमध्‍ये पालट) होत असल्‍याने त्‍या भावनिक आणि संवेदनशील होतात; म्‍हणून महिला संघटनांनी प्रत्‍येक मासात एकदा तरी शाळांमध्‍ये जाऊन १२-१३ वर्षांच्‍या मुलींचे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या धोक्‍यांविषयीचे प्रबोधन केले पाहिजे.