भारताने चंद्रावर ‘चंद्रयान ३’ पोचवून घेतलेल्या गरुडझेपेचे सूक्ष्म परीक्षण !

२३.८.२०२३ या दिवशी भारताच्या ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी अपार परिश्रमाने सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी ‘चंद्रयान ३’ चंद्रावर उतरवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. यावरून भारतीय वैज्ञानिकांच्या प्रतिभेचे जितके कौतुक करावे तितके ते अल्प आहे. ‘चंद्रयान ३’चे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कु. मधुरा भिकाजी भोसले

१. ‘चंद्रयान ३’ या यानाची अंतराळ मोहीम यशस्वी करणार्‍या संपूर्ण ‘इस्रो’ गटातील वैज्ञानिकांचे गुणवैशिष्ट्ये !

संपूर्ण ‘इस्रो’च्या गटातील वैज्ञानिक अत्यंत सात्त्विक आणि प्रतिभाशाली आहेत. ते भारताचे खरे राष्ट्रभक्त आहेत. त्यांच्यावर खगोलशास्त्राचे जनक आर्यभट्ट यांची विशेष कृपा असून ते भारतीय शास्त्रज्ञांना खगोलशास्त्राविषयी मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे इस्रोचे शास्त्रज्ञ धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यावर नवग्रह देवता आणि नक्षत्रदेवता यांचीही कृपा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वैज्ञानिक क्षेत्रातील मोठी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण होते.

२. ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ यांनी श्री चेंगलम्मादेवी आणि तिरुपति बालाजी यांचे दर्शन घेतल्यामुळे ‘चंद्रयान ३’च्या वैज्ञानिक मोहिमेला दैवी शक्तींचे साहाय्य मिळून आध्यात्मिक पाठबळ प्राप्त झाल्यामुळे ती यशस्वी होणे

१४ जुलै २०२३ या दिवशी ‘चंद्रयान ३’ चे पृथ्वीवरून प्रक्षेपण होणार होते. तत्पूर्वी १३ जुलै २०२३ ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांनी श्री चेंगलम्मा परमेश्‍वरीदेवीच्या मंदिरात जाऊन तिचे दर्शन घेऊन तिला ‘चंद्रयान ३’ची मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली, तसेच ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी ‘तिरुपति बालाजी’ आणि भारतातील अन्य ठिकाणी असणार्‍या विविध देवीदेवतांचे दर्शन घेऊन त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त केले. त्यामुळे वैज्ञानिक कार्याला आध्यात्मिक पाठबळ मिळाल्यामुळे ‘चंद्रयान ३’ या यानाची चंद्रावर पोचण्याची अंतराळ मोहीम यशस्वी झाली.

श्रीविष्णूचे वाहन ‘गरुड’ आणि श्री सरस्वतीदेवीचे वाहन ‘राजहंस’ यांच्यामध्ये विविध लोकांमध्ये भ्रमण करण्याचे दैवी सामर्थ्य आहे. श्री तिरुपति बालाजीच्या कृपाशीर्वादाने श्रीविष्णूचे वाहन गरुडदेवाची शक्ती ‘चंद्रयान ३’ला लाभली.  त्यामुळे ‘चंद्रयान ३’ला  पृथ्वीवरून प्रयाण करतांना गरुड आणि चंद्राजवळ गेल्यावर राजहंस यांचे स्वरूप प्राप्त झाले अन् त्यांना यशस्वी उड्डाण आणि अवतरण करता आले.

३. देवशिल्पी विश्‍वकर्म्याचे कृपाशीर्वाद लाभल्याने ‘चंद्रयान ३’ हे यान, ‘विक्रम लँडर’ आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर ही उपकरणे भौतिकदृष्ट्या निर्दोष अन् परिपूर्ण बनणे

‘चंद्रयान-३’च्या ‘विक्रम’ लँडरमधून यशस्वीरित्या वेगळे झालेले ‘प्रज्ञान’ रोव्हर !

भारतीय वैज्ञानिकांच्या प्रार्थनेमुळे श्री तिरुपति बालाजी यांनी विश्‍वकर्मा देवाला भारतीय वैज्ञानिकांना साहाय्य करण्यास सांगितले. त्यामुळे ‘इस्रो’ने बनवलेले ‘चंद्रयान ३’ हे उपकरण भौतिकदृष्ट्या निर्दोष आणि परिपूर्ण बनले. त्यामुळे ‘चंद्रयान ३’ने अंतराळ मोहीम यशस्वी केली.

४. ‘विक्रम लँडर’ (अवतरक) आणि ‘प्रज्ञान रोव्हर’ (चंद्रबग्गी) यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘विक्रम लँडर’मध्ये श्रीविष्णूची क्रियाशक्ती कार्यरत असल्यामुळे हे उपकरण चंद्रावर यशस्वीरित्या पोचले, तसेच या ‘लँडर’मधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ नावाच्या ‘रोव्हर’मध्ये श्री सरस्वतीदेवीची ज्ञानशक्ती कार्यरत झाल्यामुळे ‘प्रज्ञान रोव्हर’ चंद्राची भौगोलिक क्षेत्र, वातावरण इत्यादींची माहिती छायाचित्रांसहित पाठवत आहे.

५. ‘चंद्रयान ३’ या यानाच्या प्रक्षेपणापासून अवतरणापर्यंतचे स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवरील महत्त्वाचे टप्पे

६. कृतज्ञता

ऋषींप्रमाणे प्रतिभासंपन्न असणार्‍या ‘इस्रो’च्या भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमामुळे आणि देवाच्या कृपेने ‘चंद्रयान ३’ची अंतराळ मोहीम यशस्वी होऊन जगात भारताची कीर्ती पसरली, तसेच ‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे ‘चंद्रयान ३’च्या अंतराळ मोहिमेच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा करता आली’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०२३, दु.३.३०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.