पुणे – येथील उद्योगपती डी.एस्. कुलकर्णी यांना जामीन संमत झाला आहे. ५ वर्षांनंतर कुलकर्णी कारागृहाबाहेर आलेले आहेत. डी.एस्.के. यांच्या १३५ मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा, ड्रीम सीटीचा ३०० एकराचा प्रकल्प यांच्या लिलावाची प्रक्रिया चालू आहे; मात्र गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही. डी.एस्.के. यांच्याकडे वेगवेगळ्या अधिकोषांचे १ सहस्र २०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. एका राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या अधिकार्याला या प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी होत आहे.