अमावास्येच्या एक आठवडा आधी आणि नंतर गुन्हे वाढतात; म्हणून या काळात सतर्क रहा !

  • उत्तरप्रदेश पोलीस महासंचालकांचा पोलिसांना गुन्हे न्यून करण्याचा आदेश !

  • हिंदु पंचांगाचा आधार घेण्याचेही आवाहन !

उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक विजय कुमार

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी एक परिपत्रक काढले आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यालय स्तरावर घडलेल्या घटनांचे विश्‍लेषण केल्यावर असे लक्षात आले आहे की, अमावास्येच्या एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रात्रीच्या वेळी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यानुसार जर आपण हिंदु पंचांग वापरून अधिक सतर्क झालो, तर गुन्ह्यांची वारंवारता न्यून होण्यास साहाय्य होऊ शकते. हे विश्‍लेषण वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या पातळीवर प्रत्येक मासाला केले जावे.

यात पुढे म्हटले आहे की, १४ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर या दिवशी अमावास्या येणार असून त्याच्या एक आठवडा आधी आणि नंतर अधिकार्‍यांनी सतर्क रहावे. गुन्हेगारी रोखणे, हे पोलिसांच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. सशक्त पोलीस दलाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना जगण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे. यासाठी रात्रीची गस्त अधिकाधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्यांच्या सुरक्षेविषयी विश्‍वास निर्माण होईल.

संपादकीय भूमिका

  • यावरून आता देशातील तथाकथित पुरो(अधो)गामी याला विरोध करून अंधश्रद्धा ठरवतील !
  • अमावास्या आणि पौर्णिमा यांच्या कालावधीत वातावरणा रज-तम वाढते. त्यामुळे अघटित घटना घडण्याचे प्रमाणही वाढते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे परिपूर्ण अशा अध्यात्मशास्त्राचा आधार घेऊन पोलीस गुन्हे अल्प करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते कौतुकास्पद आहे !