वीरांच्‍या बलीदानाप्रती कार्यक्रम साजरे करा ! – सुनील पवार, आयुक्‍त, सांगली महापालिका

‘माझी माती, माझा देश’ अभियान

पंचप्राण शपथ घेतांना सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्‍त सुनील पाटील (मध्‍यभागी), तसेच अन्‍य अधिकारी

सांगली – आपल्‍या देशाच्‍या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांना योगदानाचे स्‍मरण व्‍हावे; म्‍हणून देशात ‘माझी माती माझा देश’ अभियान ९ ऑगस्‍टपासून प्रारंभ झाले. देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृतमहोत्‍सव साजरा करतांनाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्‍हावे. भविष्‍याचा वेध घेतांना या स्‍वातंत्र्यासाठी बलीदान देणार्‍या वीरांचेही स्‍मरण व्‍हावे आणि वर्ष २०४७ पर्यंत आपला देश विकसित देश म्‍हणून नावारूपाला यावा, यांसाठी सर्वांच्‍या योगदानाची आवश्‍यकता आहे, असे आवाहन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्‍त सुनील पाटील यांनी केले. महापालिका मुख्‍यालयात ‘माझी माती माझा देश’ या अभियानात ते बोलत होते.

या प्रसंगी हातात दिवे लावून ‘पंचप्राण शपथ’ घेण्‍यात आली. या कार्यक्रमास उपायुक्‍त राहुल रोकडे, सभागृह नेत्‍या भारती दिगडे, नगरसचिव श्री चंद्रकांत आडके, ‘सिस्‍टीम मॅनेजर’ नकुल जकाते, नगरअभियंता पांडव, हळकुंडे उद्यानाचे अधीक्षक गिरीश पाठक, सर्व कर्मचारी, अधिकारी, तसेच जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उपस्‍थितीत होते.