महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवीला अटक  !

(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

जकार्ता (इंडोनेशिया) – महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवी पांजी गुमिलांग यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर इस्लामचा अवमान करणे आणि द्वेष पसवणारे भाषण करणे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. पांजी यांच्या निर्णयामुळे देशात असंतोष निर्माण झाला होता. या आरोपासाठी पांजी यांना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. पांजी यांच्या समर्थकांनी मात्र ‘पांजी यांना झालेली अटक, हा त्यांच्यावर अन्याय आहे’, असा आरोप केला आहे.