सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश
नवी देहली – हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष देतांना ती हिंदीतून द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिले. न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यासंदर्भात म्हणाले की, साक्षीदार हे जरी इतर राज्यातील असले, तरी त्यांनी साक्ष हिंदीतूनच द्यावी. आपला देश हा वैविध्यपूर्णता असलेला देश आहे. या देशात विविध भाषा बोलल्या जातात. देशात जवळपास २२ अधिकृत भाषा आहेत. असे असले, तरी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याने साक्षीदारांनी त्यांची साक्ष ही हिंदीतूनच देणे अपेक्षित आहे.
हिंदी राष्ट्रभाषा है: पश्चिम बंगाल के गवाहों की गवाही पर बोला सुप्रीम कोर्ट, जानिए क्या है पूरा मामला #सुप्रीमकोर्ट #हिंदी #यूपी #गवाह #hindi #westbengal #siliguri #uttarpradesh https://t.co/V83vOA93dD
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) August 4, 2023
उत्तरप्रदेशातील वाहन अपघात प्राधिकरणासमोर असलेले एक प्रकरण बंगाल राज्यात सुनावणीसाठी न्यावे, अशी याचिका याचिकाकर्त्यांनी केली होती. उत्तरप्रदेशातील फर्रूखाबाद येथील प्राधिकरणासमोर हे प्रकरण चालू आहे. हे प्रकरण बंगालमध्ये दार्जिलिंग येथे सुनावणीसाठी पाठवावे, अशी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, सगळे साक्षीदार हे सिलिगुडीचे असून फर्रूखाबादमधील प्राधिकरणासमोर हे प्रकरण चालले, तर त्यात भाषेचा अडथळा निर्माण होऊ शकतो. ही याचिका न्यायालयाने वरील निर्देश देत फेटाळून लावली.