भीलवाडा (राजस्थान) – येथील कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत जाळण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना कह्यात घेतले आहे.
A girl was allegedly burned to death in a coal furnace in a village in Rajasthan’s Bhilwara district.#News #Bhilwara https://t.co/9tQrmPLdWT
— IndiaToday (@IndiaToday) August 3, 2023
मृत मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले की, त्यांची अल्पवयीन मुलगी २ ऑगस्ट या दिवशी सकाळी घरातून गुरे चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेणे चालू केले. ग्रामस्थ आणि कुटुंबीय तिचा शोध घत रात्री उशिरा गावाबाहेरील कोळशाच्या भट्टीतजवळ पोचले. त्या वेळी त्यांना मुलगी जळतांना त्यांना दिसली. यानंतर राजस्थानमधील गुर्जर महासभेचे प्रदेशाध्यक्ष, तसेच भाजपचे नेते कालूलाल गुर्जर, जिल्हाध्यक्ष शंकरलाल गुर्जर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी आंदोलन करण्यास आरंभ केला. आंदोलकांनी घटनास्थळावरून अल्पवयीन मुलीचे अवशेष उचलण्यास नकार दिला.
संपादकीय भूमिकाअसे पाशवी कृत्य करणार्या नराधमांना भर चौकात फाशी द्या ! |