अंती शरणागत मी तव चरणी ।

‘साधनेचे प्रयत्न करतांना मनातील विचारांमुळे चित्त स्‍थिर होत नाही. ते स्‍थिर होण्‍यासाठी गुरुचरणी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी) प्रार्थना करतांना सुचलेल्‍या ओळी येथे दिल्‍या आहेत.

सौ. स्‍वाती शिंदे

ऐसी कैसी माझी मती ।
एकाग्रता साधे न चित्ती ॥ १ ॥

मनाची घागर होईना रीती ।
प्रयत्नांची पराकाष्‍ठा करावी किती ॥ २ ॥

अंती शरणागत मी तव चरणी ।
गुरुराया (टीप), आपणच द्यावी मज साधनेत गती’ ॥ ३ ॥

टीप : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२२)