एक ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून त्याची सिद्धता गेल्या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत. युरोपमधील अन्य देश आता सतर्क झाले असून फ्रान्समध्ये जे घडले ते कुठेही घडू शकते. आज भारतात अवैध पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना अनेक ठिकाणी वसवले जात आहे. या घुसखोरांविषयी केंद्र सरकारने कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील.