कॉन्‍व्‍हेंट शाळांचा ‘अल्‍पसंख्‍यांक’ दर्जा काढा ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

झारखंड येथील एका कॉन्‍व्‍हेंट शाळेत कपाळावर टिकली लावली; म्‍हणून शिक्षिकेने एका विद्यार्थिनीच्‍या थोबाडीत मारली. या अपमानामुळे उषा कुमारी या हिंदु विद्यार्थिनीने आत्‍महत्‍या केली. हे छळाचे पहिले उदाहरण नसून यापूर्वी देशभरात ठिकठिकाणी कॉन्‍व्‍हेंट शाळांमध्‍ये हिंदु विद्यार्थ्‍यांसमवेत असे प्रकार घडले आहेत. भारत स्‍वतंत्र झाल्‍यावर सरकारने हिंदु विद्यार्थ्‍यांना शाळांमधून हिंदु धर्माचे शिक्षण द्यायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. आज अनेक कॉन्‍व्‍हेंट शाळांमधून केवळ ख्रिस्‍ती पंथाचे शिक्षण दिले जाते. हिंदु धर्मावर टीका केली जाते. सध्‍या कॉन्‍व्‍हेंट शाळांमधून हिंदु विद्यार्थ्‍यांच्‍या धर्मांतराचा प्रयत्न केला जात असून या शाळा हिंदूंच्‍या धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. त्‍यामुळे कॉन्‍व्‍हेंट शाळांचा ‘अल्‍पसंख्‍यांक दर्जा’ सरकारने काढून घेतला पाहिजे.