वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या धर्मध्वज पूजनाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

‘१४.६.२०२३ या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे पूजन झाले. त्या वेळी  मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

१. जाणवलेली सूत्रे

अ. मला सूक्ष्मातून दिसले, ‘ध्‍वज फार उंच आहे. ध्‍वज अवकाशमंडलाला भिडला आहे.’

आ. मी देवाला सूक्ष्मातून ‘या सोहळ्‍यात गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आम्‍हा साधकांना काय देत आहेत ?’, असे विचारले. तेव्‍हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘गुरुदेव प्रत्‍येक साधकाला धर्मध्‍वजाचे लहानसे प्रतिरूप देत आहेत.’

इ. मला वाटले की, ‘गुरुदेव भारतभरातून आलेल्‍या सगळ्‍या साधकांना आपापल्‍या क्षेत्रात जाऊन धर्मकार्य करायला आशीर्वाद आणि शक्‍ती देत आहेत.’

२. अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विशाल रूपात आहेत.

श्री गुरूंनी या दिव्‍य कार्यक्रमात मला सहभागी करून घेतले, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) रश्‍मि परमेश्‍वरन (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ४६ वर्षे), केरळ (२२.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.