‘रुग्‍णसेवा, म्‍हणजे जनता जनार्दनाची सेवा’, असा भाव असलेले रामनाथी आश्रमातील साधक वैद्य आणि आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) !

१. पूर्वीच्‍या काळातील वैद्यांची रुग्‍णांकडे पहाण्‍याची सेवाभावी वृत्ती

श्री. गुरुप्रसाद गौडा

‘रुग्‍णांची सेवा, म्‍हणजे जनता जनार्दनाची सेवा’, असे पुराणात सांगण्‍यात आले आहे. पूर्वीचे वैद्य रोग्‍यांची शुश्रूषा ‘जनार्दनाची सेवा’, या भावाने करत असत. ते रुग्‍णांकडून कशाचीही अपेक्षा न करता अल्‍प पैसे घेत. त्‍यांच्‍यात ‘रुग्‍णसेवा ही समष्‍टी सेवा आहे’, असा भाव असायचा. वैद्यांच्‍या वागणुकीमुळे रुग्‍णांना त्‍यांचा आधार वाटत असे.

२. सध्‍याच्‍या काळातील बहुतांश आधुनिक वैद्यांची लोभी वृत्ती

आता वैद्यकीय क्षेत्रातील सेवा इतक्‍या खालच्‍या स्‍तराला गेली आहे की, ‘रुग्‍णाला आधार वाटणे’, ही गोष्‍टतर पुष्‍कळ दूरची झाली आहे. रुग्‍णाला वैद्यकीय क्षेत्राकडून कोणताही आधार मिळत नाही आणि त्‍याच्‍यात एक प्रकारची भयाची स्‍थिती निर्माण होते. ‘जनता जनार्दनाची सेवा’ ही वृत्ती लोप पावली असून ‘शक्‍य तितके रुग्‍णाला लुबाडायचे आणि पैसा मिळवायचा’, असा अत्‍यंत दुर्दैवी प्रघात वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झाला आहे.

३. साधक वैद्य आणि आधुनिक वैद्य यांचा आलेला चांगला अनुभव

एकदा मी सनातनच्‍या रामनाथी आश्रमातील साधक-वैद्यांकडे गेलो होतो. वैद्यांनी घेतलेली माझी काळजी पाहून मला पूर्वीच्‍या काळातील वैद्यकीय दृष्‍टीकोनाची आठवण झाली. साधक-वैद्य रुग्‍णांची सेवा करतांना ‘प्रत्‍यक्ष जनार्दनाची सेवा करत आहोत’, या भावाने करतात. त्‍यांच्‍या प्रत्‍येक कृतीतून ‘रुग्‍णांची सेवा करणे’, ही समष्‍टी साधना आहे’, हा भाव लक्षात येतो. तिथे मला आलेला अनुभव पुढे दिला आहे.

३ अ. प्रेमाने आणि संयमाने त्रासाविषयी विचारणे : वैद्यांंनी मला अत्‍यंत प्रेमाने बसायला सांगितले आणि मला होत असलेल्‍या त्रासाविषयी विचारले. त्‍या वेळी माझे लक्ष त्रासाकडे न जाता ‘गुरुदेवांनी घडवलेले साधक-वैद्य कसे असतात ?’, याकडे गेले.

३ आ. वैद्यांनी प्रार्थना करून बोलणे : वैद्यांनी माझ्‍याशी बोलण्‍याआधी प्रार्थना केली. त्‍यांनी चेहर्‍यावर मंद हास्‍य ठेवून मला त्रासाची लक्षणे विचारली. तेव्‍हा ‘काही लपवून न ठेवता सर्व समस्‍यांविषयी मोकळेपणाने सांगावे’, असे मला वाटले. मी त्‍यांना सर्व मोकळेपणाने सांगितले.

३ इ. तपासणीच्‍या वेळेत पालट झाल्‍याचे आठवणीने कळवणे : एका रात्री वैद्यांंनी मला दुसर्‍या दिवशी सकाळी रिकाम्‍या पोटी तपासणीसाठी यायला सांगितले होते. काही कारणाने वेळेत पालट झाल्‍याने त्‍यांनी भ्रमणभाष करून मला पालट झालेल्‍या वेळेविषयी आठवणीने सांगितले.

३ ई. वैद्यांनी आईप्रमाणे आधार देणे : वैद्यांनी मला माझे त्रास न्‍यून होऊन प्रकृती चांगली व्‍हावी, या दृष्‍टीने काही नियम पाळावयास सांगितले. हे नियम त्‍यांनी काळजीपूर्वक सांगितले आणि मला आधारही दिला. वैद्य हे सांगत असतांना ‘जणू एक आईच मुलाला सर्व सांगत आहे’, असा भाव मला अनुभवता आला.

आज सनातनचे साधक वैद्य आणि आधुनिक वैद्यही (डॉक्‍टरही) रुग्‍ण साधकांसाठी मोठा आधारस्‍तंभ बनले आहेत. या वैद्यांच्‍या प्रेमभावामुळे अत्‍यल्‍प काळात रुग्‍ण साधकांत उत्‍साह निर्माण होतो. साधक-वैद्यांना भेटल्‍यावर ‘हिंदु राष्‍ट्रातील वैद्यकीय चिकित्‍सा अशीच असेल’, याची मला निश्‍चिती झाली. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ४२ वर्षे) मंगळुरू, कर्नाटक. (२५.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक