सीमा हैदर हिला पाकिस्तानात पाठवावे !

‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात ७५ टक्के लोकांची मागणी

पाकिस्तानी महिला सीमा हैदर

नवी देहली – भारतात घुसखोरी केलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिला परत पाकिस्तानात पाठवायला हवे का ?, याविषयी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार ७५ टक्के लोकांनी सीमा हैदर हिला पाकिस्तान पाठवावे, अशी मागणी केली. यासह २५ टक्के लोकांनी ‘तिला भारतात रहाण्यास अनुमती द्यायला हवी’, असे मत नोंदवले. या सर्वेक्षणात देहली, नोएडा, लक्ष्मणपुरी आणि भोपाळ येथील रहिवाशांनी वेगवेगळी मते नोंदवली आहेत. सर्वेक्षणांच्या पहिल्या फेरीत सीमा हैदर हिला भारतात रहाण्याची अनुमती द्यावी, या मागणीकडे लोकांचा कल होता; मात्र जशी अधिकाधिक लोकांची मते घेतली गेली, तेव्हा बहुतांश लोकांनी सीमा हैदर हिला पाकमध्ये पाठवण्याची मागणी केली.