विवेकाचे महत्त्व

‘देवीदेवता, गुरु आणि संतसुद्धा तुमची उन्‍नती तेव्‍हा करतील, जेव्‍हा तुम्‍ही आपल्‍या विवेकाचा आदर कराल. तुमच्‍याकडे विवेक असेल, तर त्‍यांचा संप्रदाय तुम्‍हाला सल्ला देऊ शकेल, मोक्ष देऊ शकत नाही. मोक्ष तर ते देऊन टाकतील; पण त्‍यात तुमच्‍या विवेकाची आवश्‍यकता आहे. शिक्षक तुम्‍हाला धडा शिकवू शकतो; पण पाठ तर तुम्‍हालाच करावे लागेल. शिक्षक फलकावर लिहू शकतो; परंतु स्‍मृतीत लिहिण्‍याचे उत्तरदायित्‍व तुमचे असते. अगदी तसेच विवेकाचा आदर करून जीवन जगण्‍याचे दायित्‍व तुमचे आहे. असे उत्तरदायित्‍व मानाल, तर जीवनदाता तुमचा आत्‍मा प्रगट होईल.’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२२, अंक ३५०)