जन्‍म-मरणापासून सोडवते, तीच खरी विद्या !

‘एकदा भोज राजाने एका रत्नपारख्‍याला बक्षीस देण्‍याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्‍याने हिरे पारखण्‍यात अतुल्‍य चमत्‍कार दाखवला आहे. तुम्‍हाला जे योग्‍य वाटेल, ते बक्षीस याला द्या.’’

मंत्री म्‍हणाला, मला तर हेच योग्‍य वाटते, ‘याच्‍या डोक्‍यावर ७ जोडे मारावेत ! एकतर मनुष्‍य-जन्‍म मिळणे कठीण आहे, त्‍यातही इतकी उत्तम बुद्धी !… आणि या बुद्धीला मूर्खाने दगड पारखण्‍यात लावले ! ही दगड पारखण्‍याची विद्या याला जन्‍म-मरणापासून सोडवेल का ?’’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२२, अंक ३५०)