१. ‘गुरुसेवक होण्यासाठी कोणतीही सेवा श्रेष्ठ वा कनिष्ठ नसून स्नानगृह स्वच्छतेच्या सेवेतूनही जीवनमुक्त होऊ शकतो’, असे सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे
‘माझ्यामध्ये ‘लोकेषणा आणि तुलना करणे’, हे अहंचे तीव्र पैलू आहेत. फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मी ८ मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी गेले होते. ज्या वेळी माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू उफाळून येत असत, त्या वेळी सौ. सुप्रियाताई मला वेळोवेळी साहाय्य करत असत. एकदा ऑनलाईन कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची सेवा अन्य साधिकेला मिळाली. तेव्हा माझ्या मनात तुलनेचे विचार आले, ‘मला ती सेवा मिळायला हवी.’ त्या वेळी सुप्रियाताईने सांगितले, ‘‘तुम्हाला वक्ता किंवा सूत्रसंचालनाचीच सेवा करायची आहे का ? तुम्ही सनातनमध्ये वक्ता बनण्यासाठी आला आहात कि गुरुसेवक बनण्यासाठी आला आहात ? ‘वक्ता-प्रवक्ता बनणे, ही श्रेष्ठ सेवा आहे’, असे तुम्ही स्वतःच ठरवता आणि ती सेवा मिळाली नाही की, तुमच्या मनाचा संघर्ष होतो. जर तुम्हाला आश्रमातील सर्व स्नानगृहे आणि कमोड धुण्याची सेवा मिळाली, तर तुम्ही विचार कराल, ‘मी ही कनिष्ठ सेवा करत आहे.’ तुमच्या साधनेची स्थिती चांगली नाही; परंतु हीच स्नानगृह आणि कमोड धुण्याची सेवा करून येथील काही साधक जीवनमुक्त झाले आहेत.’’
२. काही कालावधीनंतर सेवाकेंद्रात स्नानगृह स्वच्छता करण्याची सेवा मिळणे; परंतु त्या वेळी मनात कोणताही अयोग्य विचार न येता सौ. सुप्रियाताईने दिलेल्या योग्य दृष्टीकोनामुळे मन स्वच्छ झाल्याची जाणीव होणे
देहली सेवाकेंद्रात आल्यावर मला प्रतिदिन कमोड स्वच्छ करण्याची सेवा मिळाली. तेव्हा सौ. सुप्रियाताईने सांगितलेले सूत्र मी पूर्णतः विसरले होते. एक दिवस अकस्मात् मला ते सूत्र आठवले. तेव्हा लक्षात आले की, ‘आता माझ्या मनात कमोड स्वच्छ करण्याची सेवा कनिष्ठ आहे आणि वक्ता-प्रवक्ता ही सेवा श्रेष्ठ आहे’, असे कोणतेही विचार येत नाहीत. तेव्हा असे वाटले, ‘त्या वेळी सुप्रियाताईने माझ्या मनातून अयोग्य दृष्टीकोन काढून टाकले. त्यामुळे माझे मन स्वच्छ होऊ शकले.’
३. अध्यात्मामध्ये सेवक बनणे, हीच साधना असल्याचे सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी सांगणे
हे सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘अध्यात्मामध्ये सेवक बनणे, हीच साधना आहे. गुरूंकडे केवळ हेच मागितले पाहिजे की, मला आपला सेवक बनवा. मला साधक बनवा.’’
– कु. कृतिका खत्री, देहली सेवाकेंद्र (१६.१२.२०२०)