‘सूर्य अस्‍तित्‍वाने अनेक कार्ये प्रभावीपणे करत असतो, त्‍याप्रमाणे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अस्‍तित्‍वाने ‘ब्रह्मोत्‍सवा’त अनेक कार्येही घडणे’, यासंदर्भातील विश्‍लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘११.५.२०२३ या दिवशी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मदिनानिमित्त फर्मागुडी (गोवा) येथे ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. साधकांना दर्शन मिळण्‍यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची रथातून फेरी काढण्‍यात आली. या २५ मिनिटांच्‍या फेरीत त्‍यांनी ‘स्‍थूल’ आणि ‘सूक्ष्म’ कार्ये केली आणि त्‍यात ‘त्‍यांनी साधकांना जे काही द्यायचे होते ते दिले आहे’, असे मला जाणवले. त्‍यामुळे ‘एवढ्या वेळेतच कार्यक्रम पूर्ण झाला’, असे मला वाटले.

श्री. राम होनप

१. रथाच्‍या फेरीच्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी केलेले कार्य

१ अ. स्‍थूल कार्य : परात्‍पर गुरु डॉक्‍टर कार्यक्रमातील उत्तरदायी साधकांना कार्यक्रम आणखी चांगला होण्‍यासाठी आवश्‍यक सूत्रे, तसेच काही त्रुटी वेळोवेळी सांगत होते.

१ आ. सूक्ष्मातील कार्य

१. कार्यक्रमाला उपस्‍थित असलेल्‍या आणि उपस्‍थित नसलेल्‍या सर्वत्रच्‍या साधकांना त्‍यांच्‍या पातळीनुसार परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती प्रदान केली.

२. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी वातावरणातील आणि पाताळांतील असुरांशी सूक्ष्मातून लढा दिला. त्‍यामुळे त्‍यांचा जोर न्‍यून होण्‍यास साहाय्‍य झाले.

३. काही अतृप्‍त आत्‍मे कार्यक्रमाच्‍या ठिकाणी गती मिळण्‍यासाठी आले होते. त्‍यांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या देहातून प्रक्षेपित होत असलेल्‍या शक्‍तीमुळे गती मिळण्‍यास साहाय्‍य झाले.

४. ‘भुवर्लोक’, ‘स्‍वर्गलोक’ आणि ‘महर्लोक’ येथील काही जिवांना साधनेसाठी शक्‍ती आणि प्रेरणा मिळाली.

२. ‘सूर्याच्‍या अस्‍तित्‍वाने पृथ्‍वीवर अनेक कार्ये प्रभावीपणे घडत असतात, त्‍याप्रमाणे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अस्‍तित्‍वाने ‘ब्रह्मोत्‍सवा’त बरेच काही कार्य घडले’, असे मला जाणवले.’  

–  श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)