‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
१. शुद्ध कर्म, ज्ञान आणि भक्ती यांमुळे हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !
‘प्रभु श्रीराम अयोध्येतून वनवासाला निघाले होते. वनवासाच्या कालावधीत त्यांनी ३ ऋषींना ३ गोष्टी विचारल्या. ऋषि भरद्वाज यांना पुढे जाण्याचा मार्ग, ऋषि वाल्मीकींना रहाण्यासाठी ठिकाण आणि अगस्तिमुनींना राक्षसांना मारण्याचा मंत्र विचारला. भरद्वाजऋषींचा आश्रम गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या संगमावर होता. गंगेचा अर्थ भक्ती, यमुनेचा अर्थ कर्म आणि सरस्वतीचा अर्थ आहे ब्रह्मविद्या ! ज्या महापुरुषाच्या जीवनात ज्ञान, भक्ती आणि जलकमळासारखे कर्मही शुद्ध आहे, ते धर्माची स्थापना करू शकतात. ‘रामचरितमानस’मध्ये लिहिले आहे, ‘प्रभु श्रीरामाने ऋषि भरद्वाज यांना मार्ग विचारला. त्यांनी त्यांच्या शिष्यांना हाक मारली, तेव्हा त्यांचे ५० शिष्य एकाच वेळी आले. त्या ५० पैकी ऋषि भरद्वाजांनी केवळ ४ जणांना निवडले आणि म्हटले की, हे जेथे सांगतील तेथे जावे.’ त्यामुळे हिंदु राष्ट्र येण्यासाठी आपल्यातही ज्ञान, भक्ती आणि शुद्ध कर्म असले पाहिजे.
२. धर्मांतर थांबवण्यासाठी साधूसंतांनी समाजाला धर्मशिक्षण द्यावे !
जगात विविध पंथ आणि नवनवीन संप्रदाय निर्माण झाले आहेत. प्रत्येक जण निरनिराळे सांगतो. त्यामुळे हिंदु जनमानस विभागला गेला आहे. केवळ लोकच नाही, तर संतांनाही जाती, धर्म आणि पंथ यांमध्ये विभागले आहे. हिंदू असंघटित असल्यामुळे परधर्मियांकडून धोका वाढला आहे. त्यामुळे जेव्हा हिंदू एकजूटीने रहातील, तेव्हाच रामराज्य येऊ शकते. हिंदु नास्तिकतावादी विविध माध्यमांतून धर्माविषयी अपप्रचार करतात. त्यामुळे आपले लोक धर्मापासून लांब जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी साधूसंतांना समाजात जाऊन लोकांना धर्मशिक्षण द्यावे लागेल. मोठ्या मंदिरात ठराविक दिवशी हनुमानचालिसाचा पाठ किंवा सत्संग यांचे आयोजन करावे. तसे केल्याने लोकांची धर्मावरील श्रद्धा वाढेल आणि धर्मांतराला आळा बसेल. धर्मांतरितांवर सामाजिक बहिष्कार टाका. त्यांच्याशी ‘रोटी आणि बेटी’ व्यवहार बंद करा. काही दिवसांनी ते ख्रिस्ती पंथ सोडून परत हिंदु धर्मात प्रवेश करतात.
पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी महाराज यांचा परिचय

दिगंबर आखाड्याचे पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी महाराज हे गोंदिया येथील ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष आहेत. ते ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’चे सदस्य आहेत. ते गोहत्या आणि धर्मांतर थांबवणे, या कार्यात सक्रीय आहेत. त्यांनी गोंदियामध्ये धर्मांतर थांबवण्यात १०० टक्के यश मिळवले आहे.
३. भारतातील कृषी आणि ऋषी यांच्यावर संकट
आज कृषी आणि ऋषी या दोघांवरही आक्रमणे होत आहेत. कृषीवर आक्रमण झाल्याने गोधन संपेल आणि ऋषींवर आक्रमण झाल्यास लोकांची हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट होईल. कृषी परंपरा वाचवण्यासाठी गोवंश वाचवावा लागेल आणि धर्मांतर थांबवण्यासाठी ऋषी परंपरेला वाचवावे लागेल. आपली पूर्वीची गुरुकुल परंपरा सध्या चालू नसून हिंदूंची मोठी मंदिरे आणि मठ येथे गुरुकुल परंपरा आरंभ केली पाहिजे. वर्तमानयुगात दीक्षा देण्याची परंपराही नष्ट झाली आहे. देश जलद पुढे जात आहे; पण नेमका कुठे जात आहे, हे सांगता येत नाही. एकीकडे देश सर्व क्षेत्रांत प्रगती करत आहे; पण आपले हृदय संकुचित होत चालले आहे. लोक ‘आम्ही दोन आणि आमची दोन’ यांमध्ये अडकली आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांचे सख्खे भाऊ-बहीण आणि आई-वडील परके वाटू लागले आहेत; पण आज सर्व हिंदु समाजानेच एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत असतांना त्याला विरोधही होण्याची शक्यता आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमण करत रहाणे आवश्यक आहे.’
– पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, संस्थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया.
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटणे आणि भारताने घ्यावयाचा धडा !
युद्ध संपवण्यामागील अमेरिकेची अस्वस्थता !
‘ॲमेझॉन’च्या ‘ॲमेझॉन नाऊ’ विज्ञापनातून थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा अक्षम्य अवमान !
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !