वन्दे भारत एक्स्प्रेस गाडीचा रंग निळ्याऐवजी भगवा करणार !

रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांची घोषणा

रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव नव्या रंगातील वंदे भारत रेल्वे सोबत (डावीकडे)

चेन्नई (तमिळनाडू) – रेल्वेने वन्दे भारत एक्सप्रेसचा रंग पालटला असून तो निळ्याऐवजी भगवा करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांनी केली. ते म्हणाले की, भारतीय ध्वजातून प्रेरणा घेऊन हा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याखेरीज वन्दे भारत गाडीमध्ये २५ किरकोळ पालटही सोयीसाठी करण्यात आले आहेत.


सध्या देशभरात २५ वन्दे भारत एक्सप्रेस गाड्या धावत असून २ गाड्या राखीव आहेत, तर २८ व्या गाडीला प्रायोगिक तत्त्वावर भगवा रंग देण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी सध्या चेन्नईतील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’मध्ये ठेवण्यात आली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ८ जुलै या दिवशी कारखान्याची पहाणी केली. या कारखान्यातच ‘मेक इन इंडिया’ (भारतीय बनावटीच्या) वन्दे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती केली जाते.

संपादकीय भूमिका

प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणार्‍या हिंदुविरोधी राजकीय पक्षांनी यावरून रेल्वेचे ‘भगवेकरण’ केल्याची बांग ठोकली, तर आश्‍चर्य वाटू नये !