तुम्ही मला एवढे भरभरून दिले आहे की, कृतज्ञता व्यक्त करायला माझ्यापाशी शब्द नाहीत. अथांग महासागरातील पाण्याच्या एका थेंबाएवढे माझे अस्तित्व… !; परंतु तुमचे त्याकडे लक्ष गेले आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले. यासाठी तुमच्या चरणी कशी कृतज्ञता व्यक्त करू ? ‘इतर साधकांच्या तुलनेत मी काहीच सेवा करत नाही, तरीही देवा, तू मला जवळ केलेस, यासाठी तुझी कशी उतराई होऊ ?
– सौ. ज्योती सुदीन ढवळीकर
(वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), गोवा.
व्यवहारात आपण एखाद्या गावाला जातांना वाट चुकलो आणि तेव्हा एखाद्याने साहाय्य केल्यावर किती चांगले वाटते ! त्या व्यक्तीविषयी किती प्रेम वाटते ! अध्यात्मात माझे ईश्वरप्राप्ती जाणे हे अंतिम ध्येय आहे. त्याकडे जाण्यासाठी साधक मला चुका सांगून साहाय्य करतात; म्हणून मी त्यांचे पायच पकडायला हवे. एवढी कृतज्ञता वाटायला हवी; कारण त्यांच्यामुळे मी माझ्या ध्येयाकडे लवकर जाऊ शकतो.
– श्री. नंदकुमार कैमल, केरळ
हे गुरुमाऊली, ग्रंथ, दैनिक, संत, उन्नत साधक यांच्याकडून आम्हाला अमूल्य ज्ञान मिळत आहे. हा ज्ञानकोष आम्हाला सहज उपलब्ध करून दिल्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आपण आम्हाला विविधतेने नटलेल्या कलादालनांचा लाभ घेण्याची संधी दिली, आपला सत्संग देत आहात. यासाठी कृतज्ञता !
– सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
श्रीहरि विष्णु तुम्ही आहात माझे स्वामी ।
घ्याल का हो देवा, मला तुमच्या चरणी ॥
विलीन होण्यास आतुर झाला हा जीव ।
कधी होईन देवा, मी तुझ्याशी एकरूप ॥
– कु. दीपाली माळी (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
कृतज्ञता सदैव राहू दे अंतरी ।
तरून जाण्या या भवसागरी ॥ १ ॥
दोष अन् अहं यांचे पाश जरी ।
मायेतून सोडवूनी तू मुक्त करी ॥ २ ॥
त्रासाने जीव नकोसा झाला तरी ।
कठीण समयी सांभाळ तू करी ॥ ३ ॥
कृतज्ञतेचा आदर्श तू या भूवरी ।
कृतज्ञतेने जगणे होऊ दे क्षणोक्षणी ।
अशी प्रार्थना असे तव चरणी ॥ ४ ॥
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘प.पू. डॉक्टर, आम्ही स्थुलातील प्रत्येक कृती तुमची सेवा म्हणून करत असतो. तुमच्याच आश्रमात वावरतो. कपडे हेही तुमचा प्रसाद म्हणून परिधान करतो. जीवनातील कोणतीही गोष्ट आपल्या कृपेविना उपभोगू शकत नाही. ही प.पू. डॉक्टरांची महानता आणि कृपा आहे. आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. प्रत्येक श्वासासह तुम्हीच मला त्याची जाणीव करवून द्या.’
– सौ. सुषमा नाईक (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
हेे गुरुदेवा, तू जन्मोजन्मी माझा सांभाळ करत आहेस. तुझ्या या लेकराचे सर्व लाड पुरवत आहेस. गुरुमाऊली, तुझ्या कृपेच्या पदराखाली मी अतिशय सुरक्षित आहे. कृतज्ञता… कोटी कोटी !
– सौ. अवनी आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आपल्या छत्रछायेखाली साधकांना सर्वार्थाने सांभाळणार्या गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !